Friday, August 27, 2010

तू कविता का लिहतोस

तू कविता का लिहतोस!





कोण म्हणाले मला,तू कविता का लिहतोस!

अहो! सूर्यास म्हणू नका तू उजेड का देतोस!



प्रयत्नाच्या शेतात प्रतिभा पेरली मी,
का म्हणता मग, ते काव्य पिक तू का उगवतोस



काव्यकंद फुलले माझे,सुंगधी स्वरांचे

तरीही का म्हणता,त्यात तू का न्हातोस



झाली कविता माझी स्वर्गपरी,

का म्हणता मग तुम्ही,तू कविंद्र का होतोस




कवीः श्री.संजय जी. भोसले

Friday, July 23, 2010

माय मराठी कविता

कविता म्हणजे…

कविता म्हणजे कारुण्य कैवल्यतेचं

कैवल्यतेत अंकुर उगवत भक्तिचं

भक्तीत बळ असतं श्रद्धेचं

श्रद्धेत सार्मथ्य असतं जग जिंकण्याचं

जगाला सूर्यासारख तेजस्वी करण्याचं



 कवीः संजय गोरख भोसले ( मु.पो. पापरी)