Tuesday, June 14, 2011

Ganapapti

कवितेचे नावःसण आला गणेशाचा ।



जनी मनी घरादारात । आला बाप्पा आनंदात ॥

कलीयुगाच्या संकटात । विघ्नहर्ता देतो साथ ॥

उधळता गुलाल मेवा । विघ्न हारले तू देवा ॥

ढोल लेझीमाचा नाद । घाले गणरायाला साद ॥

विनायकाच्या चरणी । सर्व विश्व धरणी ॥

एकदंत सदा स्मरणी । चिंता हारतो चिंतामणी ॥

लाडू मोदक पक्वानाचा । सण आला गणेशाचा ॥

कवीःश्री संजय जी भोसले

No comments:

Post a Comment