RESUME NAME: Sanjay Gorakh Bhosale PERSONAL DETAILS Date of Birth : 20st JULY. 1983 Gender :MALE Marital Status : Unmarried. Permanent Address : AT/POST:PAPARI,TAL.:MOHOL,DIST:SOLAPUR Phone no. : ८९८३५४३०८३ Languages Known : Marathi, English , Hindi Nationaltity : Indian.
Friday, May 10, 2013
Shiv bhajan
Saturday, June 30, 2012
मराठी
कवितेचे नाव : ब्रम्हरस मराठी
ही मराठी बोलणी
आहे खरी ब्रम्हरसाची
रूजली भाषा मराठी अंतरी ब्रम्हरसाची
जाणली आम्ही मराठी मानली आम्ही मराठी
मानवी शांती मराठी ही उरी ब्रम्हरसाची
काळजाच्या भावनेला साद घाले ही मराठी
मायमाऊली मराठी
मंजरी ब्रम्हरसाची
प्रणवाची हंसनी चिंतामणी आहे मराठी
ही मराठी ठेवते मोक्षाघरी ब्रम्हरसाची
ही मराठी कामधेनू ,
श्यामरंगी स्वर वेणू
ह्रदयी ही मायबोली बावरी ब्रम्हरसाची
लाभली आम्हास गोड भाषा ही मराठी
चाखतो आम्ही अमृत घागरी ब्रम्हरसाची
Friday, June 29, 2012
कवितेचे नावः कविता ईश्वराची
कवितेचे नावः
कविता ईश्वराची
झाली माझ्या मनात भक्ती ईश्वराची
आली माझ्या ज्ञानात शक्ती ईश्वराची
सर्वाठायी पाहिले मी ईश्वरत्व निर्गुणी
माया संसारात लाभली मुक्ति ईश्वराची
कृपा सदगुरूची सर्वकाही देवून गेली
युगात या जगताना मिळाली योगयुक्ती ईश्वराची
कवीः संजय गोरख भोसले ( मु.पो. पापरी)
आई-बापाच्या जीवाला
आई-बापाच्या जीवाला ...
आई-बापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं
पुंडलीकाच्या गावाला त्यांना नेयीनं नेयीनं
आईबापानं उपकार केलं आजवर अनंत
क्षणोक्षण संभाळलं नाही पडू दिली खंत
तना मनाने चरण त्यांचं पाहीनं पाहीनं
आईबापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं
आई-बापाला वाटतं पोरगं व्हावं आपलं मोठं
राञं-दिवस राबून त्यांनी भरलं माझं पोट
बाहेर नोकरी करुन त्यांना प्रेम पैसा मी देईन
आई-बापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं
पुंडलीकाच्या गावाला त्यांना नेयीनं नेयीनं
आई-बापाची आठवणं मला सारखीच येते
काळजी करून मन घायाळ होते
चिंता सोडून सगळी त्यांना आधार देईन
आज आई-बाप झालं वयानं वृद्ध
त्यांच्या सेवेसाठी झालो मी बध्द
पाय दाबत त्यांचे गुण गाईनं गाईनं
आई-बापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं
पुंडलीकाच्या गावाला त्यांना नेयीनं नेयीनं
कवीः संजय गोरख भोसले ( मु.पो. पापरी)
परमार्थाचे नियम
आत्मश्रद्धा ठेवणे.
आत्मतृप्त राहणे.
आत्मनिर्भर होणे.
आत्मचिँतन करणे.
कवीः संजय गोरख भोसले ( मु.पो. पापरी)

