Saturday, June 30, 2012

मराठी




 कवितेचे नाव : ब्रम्हरस मराठी



ही मराठी बोलणी आहे खरी ब्रम्हरसाची

रूजली भाषा मराठी अंतरी ब्रम्हरसाची

जाणली आम्ही मराठी मानली आम्ही मराठी

मानवी शांती मराठी ही उरी ब्रम्हरसाची

काळजाच्या भावनेला साद घाले ही मराठी
मायमाऊली मराठी मंजरी ब्रम्हरसाची

प्रणवाची हंसनी चिंतामणी आहे मराठी

ही मराठी ठेवते मोक्षाघरी ब्रम्हरसाची
ही मराठी कामधेनू , श्यामरंगी स्वर वेणू

ह्रदयी ही मायबोली बावरी ब्रम्हरसाची

लाभली आम्हास गोड भाषा ही मराठी
चाखतो आम्ही अमृत घागरी ब्रम्हरसाची



  • कवी : श्रीसंजय गोरख भोसले (मु. पो. पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर)

No comments:

Post a Comment