कवितेचे नावः
कविता ईश्वराची
झाली माझ्या मनात भक्ती ईश्वराची
आली माझ्या ज्ञानात शक्ती ईश्वराची
सर्वाठायी पाहिले मी ईश्वरत्व निर्गुणी
माया संसारात लाभली मुक्ति ईश्वराची
कृपा सदगुरूची सर्वकाही देवून गेली
युगात या जगताना मिळाली योगयुक्ती ईश्वराची
कवीः संजय गोरख भोसले ( मु.पो. पापरी)
No comments:
Post a Comment