Friday, June 29, 2012

आई-बापाच्या जीवाला

 कवितेचे नावः 
 आई-बापाच्या जीवाला ...


आई-बापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं
 पुंडलीकाच्या गावाला त्यांना नेयीनं नेयीनं 
 आईबापानं उपकार केलं आजवर अनंत
 क्षणोक्षण संभाळलं नाही पडू दिली खंत
 तना मनाने चरण त्यांचं पाहीनं पाहीनं 
 आईबापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं  

आई-बापाला वाटतं पोरगं व्हावं आपलं मोठं 
 राञं-दिवस राबून त्यांनी भरलं माझं पोट
 बाहेर नोकरी करुन त्यांना प्रेम पैसा मी देईन 
आई-बापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं
 पुंडलीकाच्या गावाला त्यांना नेयीनं नेयीनं

 आई-बापाची आठवणं मला सारखीच येते
 काळजी करून मन घायाळ होते 
चिंता सोडून सगळी त्यांना आधार देईन 
 आज आई-बाप झालं वयानं वृद्ध
 त्यांच्या सेवेसाठी झालो मी बध्द 
पाय दाबत त्यांचे गुण गाईनं गाईनं 
 आई-बापाच्या जीवाला जीव लावीनं लावीनं
 पुंडलीकाच्या गावाला त्यांना नेयीनं नेयीनं 

 कवीः संजय गोरख भोसले ( मु.पो. पापरी)

No comments:

Post a Comment