माय मराठी संजिवनी हनुमान चालीसा
श्रीहनुमान चरण वंदावे रोज,
मारुती सर्व संकट हारी
रघुवीरदासाची भक्ति करता
भेटती मुक्तिचारी
हिन दिन आम्हा उद्धारा
शरण तुम्हा पवनकुमार
बल बुद्धी धन देवून,
निवारा कलह विकार
जय हनुमान दिव्य गुणवंता
जय कपिश रामदुत भगवंता||१||
महारुद्र तू अतुलित बलशाली
अंजनीपुञ तू वायूसुतवाली||२||
महावीर विक्रम भला बजीरंग
कुमती निवार,दे सतसंग||३||
कमरेला लंगोटी,गळीरुद्रमाला
कानी कुंडले,अंगी पंचशैला||४||
डोकी मुकूट,हाती ध्वजा व वज्रगदा
भगवद टिळा कपाळी ,जान्हविचा खांदा||५||
सेंदुरलेपन मारुतीच्या हातात द्रोणागिरी
महारुद्र नित्य मंञ उच्चारी रामकृष्णहरी||६||
रुईटपुष्पपान गळ्यात मारुती धारी
विश्वरुपी धुम्रशेपटि फिरवतभक्ताला तारी||७||
भुभुकारे धरणी हादरुन अंतराळी उड्डाणे घेशी
सर्वञ समसंचारुन भक्ताला वर देशी||८||
परमपविञ स्ञिसंगरहित वायूसुत
श्रीरामसेवेत सदातत्पर आहे रामदुत||९||
शंकरस्वरुप केसरीनंदन,
हे तेजप्रतापी,तुज नित्य वंदन||१०||
विद्यावान गुणी अतिचतुर
रामसेवेसाठी असे तृ आतूर||११||
रामचरिञ सांगे तू रसीकाला
सिताशोध करुन दिलासा दिला||१२||
राम करुणाकर तुम्ही भवतारक
अन्यायी दुर्भाव दैत्याचे तुम्ही संहारक||१३||
पाठी तुम्ही पुरुषोत्तम मग नाही भ्यायचे
स्वधर्मी होऊन भक्ति अमृत प्यायचे||१४||
तिन्ही लोक तुमच्या हाँके भये कापती
सर्वजण तुमचे मंञनाम जपती||१५||
भूतपिसाट निकट नाही येत
मारुती महारुद्र जो असेल नाम घेत||१६||
मिटती रोग जाती सर्व पिडा षडंतर
जपतो श्रीहनुमंतास जो श्रद्धे निरंतर||१७||
संकट सर्व श्रीहनुमान निवारी
अऩन्य भक्ताला बजिरंग उद्धारी||१८||
सदाचारी राम तपस्वी राजा
हनुमान सुखी करी सर्व रामप्रजा||१९||
जो कोणी सदमनोरथ मागेल
त्या हनुमंत भक्ताला ते फळ लाभेल||२०||
चारी युगी परमतप तुमचे
प्रसिद्ध पुर्ण पराक्रमाचे||२१||
शनिमिञ पवनपुञ ब्रम्हसुञ तू
रामस्तोञ कृपादाञ कपीगोञ तू||२२||
शेपटीनेच सर्व लंका जाळली
तुझ्या वज्रमुठीत असुरं घायाळली||२३||
रामसेवेत द्रोणागिरी आणला
संजिवनी देवून सुमिञाचा प्राण वाचवला||२४||
रघुपती उत्कंठप्रेमाने तुज भेटले
तुजमुळे सर्व संकट शोक हटले||२५||
प्रभूराम किर्ति तू खूप वाढवली
भक्ताला राम भेटी घडवली||२६||
अनंत गुण स्तुती तुमच्या पुढे आहे कमी
शरणागती देवृन चित्त लावा रामनामी||२७||
लहान रुप घेवून सर्वास पाहतो
विशाल रुप घेवुन दैत्य संहारतो||२८||
नारद शारदाच्या ब्रम्हचारी ईश्वरा
हे सनकादी ब्रम्हरुप सर्वेश्वरा||२९||
कुबेरासारखे तू ऐश्वर्य देतो
सत्यभक्ताला परमधामी नेहतो||३०||
श्रीरामाला परमराज्यपदी बसवले
राम सेवेत उच्च पद भूषवले ||३१||तुमचे सर्वमंञ बिभीषण मानतो
तुमची लिला कोणी न जाणतो||३२||
रावणाला सर्वकाळ भयभित तू केले
तुझ्याहस्ते सर्व असूर मेले||३३||
सहस्ञसुर्यप्रभी श्रीहनुमान तेजपुंज
रामभक्ताला सांगतो हितगुज||३४||
पूर्ण धैर्यवंत जगजित हनुमंता
योगसुख देवून पावतो साधूसंता||३५||
शक्तिमान भक्तीमान मुक्तीमान तू हनुमान
तू नित्यजाग्रत युक्तीमान विद्यावान
सर्वाअंतरी अलिप्त तू भगवान
तुझीच स्तुती ऐको माझे देह व कान||३६||
ब्रम्हचारी हनुमान महावीर मारुती
रामह्रदयाबजिरंगा करु नित्य आरती||३७||
शुद्धभक्ताअंतरी तुझा निवास असतो
भक्त सुखी ठेवून तू परमधामी वसतो||३८||
जे ब्रम्हचारी होतात ते तुझीच रुप असतात
ऋषीमुनी संत भक्त तुझेच ध्यान करत बसतात||३९||
केसरीनंदना तुज सर्व जग करतेय वंदन
तुज चरणी सर्वस्व अर्पण तोड भवबंधन||४०||
वायूपुञ संकटहर्ता मंगलमुर्ती रुप
राम लखन सिता कृपेने भक्ति देवो खुप
कवीः संजय गोरख भोसले ( मु.पो. पापरी)
सियावर रामचंद्र की जय. खूप चांगले केले आहे.
ReplyDeleteजय जय राम श्री सिता
Delete